ट्रायची संपूर्ण मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची शिफारस

नवी दिल्ली- येत्या सहा महिन्यात संपूर्ण मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सुरु करण्याची शिफारस दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायफ केली आहे. ट्रायची ही शिफारस लागू झाल्यास मोबाईल ग्राहकांना संबंधीत कंपनी विशिष्ट सर्कलमध्ये काम करत नसली तरी तोच क्रमांक ठेवता येणे शक्य होणार आहे. यामुळे मोबाईल सेवा घेणा-या ग्राहकांना पोर्टेबिलिटीसाठी देशातील कोणत्याही सर्कलमधील मोबाईल कंपनीची निवड करता येऊ शकेल.

सध्या अस्तित्वात असलेल्या नंबर पोर्टेबिलिटीनुसार मोबाईल ग्राहकांना त्यांच्या सर्कलमध्ये असलेल्या अन्य मोबाईल कंपनीची निवड करावी लागते. उदा- जर तुम्ही महाराष्ट्र सर्कलमध्ये असाल तर पोर्टेबिलिटीसाठी या सर्कलमध्ये सेवा देणा-या कंपनीची निवड करावी लागते. जर तुमच्या सर्कलमध्ये बदल झाला तर नवा क्रमांक द्यावा लागे. जुनी कंपनी आणि तोच नंबर ठेवल्यास रोमिंग शुक्ल द्यावे लागते.

ट्रायची ही शिफारस लागू झाल्यास मोबाईल ग्राहकांना देशातील कोणत्याही सर्कलची निवड करता येईल. ट्रायने दूरसंचार विभागाला मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी परवान्यामध्ये आवश्यक बदल करण्याची शिफारस केली आहे. ज्यामुळे मोबाईल सेवा देणा-या कंपन्यांना संपूर्ण पोर्टेबिलिटी सेवा देणे शक्य होईल. सध्या अस्तित्वात असलेली नंबर पोर्टेबिलिटी 20 जानेवारी 2011 पासून लागू करण्यात आली होती.

1 thought on “ट्रायची संपूर्ण मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीची शिफारस”

Leave a Comment