सुभाष घईच्या सिनेमातून झळकणार सोनाक्षी

दिग़दर्शक सुभाष घई आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील संबध खूप चांगले आहेत. त्याकाळी सुभाष घईने त्याच्या पहिल्या सिनेमात म्हणेजच ‘कालीचरण’ मध्ये शत्रुघ्न सिन्हा घेवून तयार केली होती. त्याकाळात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानतरही सुभाष घई व शत्रुघ्न सिन्हा यांनी दोघांनी एकत्रित ब-याच सिनेमात काम केले आहे. त्याचप्रमाणे आता सोनाक्षी सोबत सिनेमा करण्याचे सुभाष घईने ठरविले आहे.

गेल्या काही दिवसात सुभाष घई यांचा सिनेमा हिट ठरला नाही. त्या‍मुळे आता सुभाष घई यांच्या सिनेमात सोनाक्षी सिन्हा काम करणार आहे. ‘कांची’ हा त्यांचा सिनेमा आगामी काळात डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे. त्यानंतर सुभाष घई सोनाक्षीच्या सोबत बॉक्स ऑफिसवर सिनेमा करण्याची तयारी करीत आहे.

सुरूवातीला घईने ‘कालीचरण’ साठी शत्रुघ्न सिन्हाने मदत केली होती. त्यामुळे आता एकदा पुन्हा सिन्हा परिवार घईच्या मदतीला धावले आहे. या सिनेमात सोनाक्षी सोबत सुशांत सिंह-राजपूत काम करणार आहे. सुशांतकडे सध्या यशराजचे दोन सिनेमे आहेत. त्यामुळे आता आगामी काळात सुशांत या सिनेमातून काम करणार असल्याने खूष आहे.