सलमान खान हा सिने इंड्रस्ट्रीचा दबंग असल्याचे सर्वांना माहित आहे. सलमान व रणबीर कूपरचे संबध अभिनेत्री कैटरीनावरुन बिघडले आहेत. त्या मुळेच गेल्या काही दिवसांपासून रणबीर सलमानच्या समोर देखील येत नाही. सलमानचा धसकाच रणबीरने घेतला आहे. त्यामुळे तो आगामी काळात येत असलेल्या बेशरम या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो ‘बिग बॉस’ मध्ये सलमानच्या समोर गेला नाही.
काही दिवसांपासून ‘बिग बॉस’ सीजन सात सुरू आहे. या शो मध्ये प्रत्येक हीरो आणि निर्माता त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येत आहे. आगामी काळात रणबीरचा ‘बेशरम’ हा सिनेमा २ ऑक्टोबरला रिलीज होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या रणबीर बीजी आहे. त्यासाठी रणबीर सोनी टीव्हीमवरील ‘केबीसी’ मध्ये गेला होता. त्याशिवाय कलर्स वरील ‘झलक दिखला जा’ आणि ‘कॉमेडी नाइट विद कपिल’ मध्ये देखील प्रमोशनसाठी गेला होता.
दुसरीकडे ‘बिग बॉस’ ला चांगला टीआरपी असताना देखील रणबीर केवळ सलमान खानच्या समोर उभे राहवे लागणार या कारणामुळे शो मध्ये आला नाही. सलमानचा मूड सर्वानांच माहित आहे. त्यामुळेच रणबीर त्याच्या आगामी काळात येत असलेल्या ‘बेशरम’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस’ मध्ये जाणे टाळत असल्याची चर्चा आहे.