मोदी-अडवाणी येणार आज एकाच व्यासपीठावर

भोपाळ – भोपाळमध्ये बुधवारी भाजपचा महाकुंभमेळा भरणार आहे. याकिकाणी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची यांची सभा होणार आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर या सभेसाठी मोदी-अडवाणी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. त्यायमुळे दोघेजण या सभेत काय बोलतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त होणा-या या विशेष रॅलीसाठी पाच लाख भाजप कार्यकर्ते येण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. मोदी यांच्याए सभेसाठी थेट अहमदाबादवरुन येणार आहेत. तर लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी विशेष विमानाने दिल्लीवरुन भोपाळमध्ये, दाखल होणार आहे.

दरम्यान, याच सभेसाठी बुरखे खरेदी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे. सभेसाठी बुरखे हे अल्पसंख्यांकांना आकर्षित करण्यासाठी ही सभा असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण याच वर्षी मध्य प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या महिन्यातच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सभा म्हणजे भाजपचे शक्तीप्रदर्शन असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment