दुर्गाशक्ती नागपाल यांचं निलंबन मागे

लखनऊ – कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल, यांच्यासमोर अखेर उत्तर प्रदेशचं अखिलेश सरकार झुकलं आहे. दुर्गाशक्ती यांचं निलंबन रद्द करण्याची नामुष्की हताश मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर आली. त्यामुळे एका प्रामाणिक आयएएस अधिकार्‍यासाठी लढणार्‍यांचा विजय झाला आहे. मात्र, त्यापूर्वी दुर्गाशक्ती यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भेट घेतली. तसंच प्रशासकिय नजर चुकांबद्दल क्षमा मागितल्याचं सांगण्यात येत आहे.

दुर्गाशक्ती नागपाल यांनी खान आणि वाळू माफियांविरोधात कारवाई, तसंच अनधिकृत बांधाकामांवर हातोडा चालवला होता. मात्र दुर्गाशक्ती यांच्यावर एका मशीदीची भिंत पाडल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र स्थानिक मीडियात येत असलेल्या बातम्यांनुसार दुर्गाशक्ती नागपाल यांनी खानमाफियांविरोधात जोरदार कारवाईला सुरूवात केली होती. म्हणून सांप्रदायिक मानसिकतेने कारवाई केल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं.

Leave a Comment