ड्रोन हल्ल्यात सहा दहशतवादी ठार

पेशावर – पाकिस्तानच्या वायव्येमधील आदिवासी भागात अमेरिकेने केलेल्या ड्रोन विमानाच्या हल्ल्यात सहा दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त रविवारी सूत्रांनी दिले. या हल्ल्यात अन्य चार दहशतवादी जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

उत्तर वझिरीस्तान भागातील शवल येथे दोन घरांवर ड्रोन विमानामधून चार क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ठार झालेले दहशतवादी हे परकीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानने अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांना विरोध दर्शविला असला तरी या विरोधास न जुमानता अमेरिकेने हे हल्ले सुरुच ठेवले आहेत.

अमेरिकेचे ड्रोन हल्ले हे आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याची भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. ड्रोन हल्ल्यांमुळे अल कायदा व तालिबानच्या अनेक महत्त्वाच्या दहशतवाद्यांना ठार करण्यात अमेरिकेला यश आले आहे. याआधी 1 ऑगस्टला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी हे ड्रोन हल्ले लवकरच थांबतील असे सांगितले हो