रुपया 158 पैशांनी वधारला

मुंबई – डॉलरच्या तुलनेत रुपयाचा किंमत आज 61.80 च्या दरम्यान आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपयात चढ-उतार पहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरातील उच्चांक मोडत आज रुपया 158 पैशांनी वधारला. याचा परिणाम शेयर बाजारावरही पाहायला मिळाला असून बीएसई सेन्सेक्सने 600 अंशांनी उसळली घेतली आहे .

अमेरिकेतील आर्थिक सुधारणा कार्यक्रम यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय अमेरिकेच्या फे़डरल रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे बाजारातील भांडवली गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. या सार्‍याचा परिणाम सेन्सेक्ससह रुपयावरही झाला आहे. व्यवहार सुरु होताच बीएसईचा सेन्सेक्स 574.13 अंशांनी झेपावला असून एनएसई सेन्सेक्स 183.65 अंशांनी वधारला आहे.