
मुंबई – आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांना सीबीआयनं क्लीन चीट दीली आहे. त्यामुल्रे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना दिलासा मिळाला आहे. आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून फायदा मिळवलाय, तेही या प्रकरणातील एक आरोपी आहेत, असं सांगत आदर्श घोटाळ्यात चव्हाणांचं नाव वगळण्यास आक्षेप घेणार्या सीबीआयनं सुशीलकुमार शिंदे यांना मात्र क्लीन चीट दिली आहे.
महत्त्वाचं म्हणजे, आदर्श आयोगासमोर साक्ष देताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विलासराव देशमुखांकडे बोट दाखवलं होतं. आदर्श सोसायटीसाठी जागा देण्याचा निर्णय आधीच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. आदर्शसाठीचं लेटर ऑफ इंटेन्ट 18 जानेवारी 2003 ला मंजूर झालं होतं, त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. मी फक्त सही केली’ असं शिंदे यांनी म्हटले होते.
