
दबंग खान आणि शाहरुख खानमध्ये तणावाच्या चर्चा नेहमीच रंगतात, असं असलं तरी शाहरुख सलमानच्या बिग बॉसचा चांगलाच फॅन आहे. दुबईत पत्रकारांसोबत बोलतांना शाहरुखनं सलमानचा शो बिग बॉसची स्तुती तर केलीच शिवाय संधी मिळाल्यास त्यात सहभागी होण्याची इच्छाही दर्शविली. आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख बिग बॉसमध्ये येऊ शकतो. आमच्या दोघांमध्ये कोणतंही शीत युद्ध सुरू नाही, असंही शाहरुख म्हणाला. बिग बॉसच्या सिझन ७चं लाँचिंग करतांना सलमाननं हे म्हटलं होतं की, शाहरुखची इच्छा असेल तर तो बिग बॉसमध्ये येऊन आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करु शकतो. सलमानच्या याच ऑफरवर शाहरुखनं पॉझिटिव्ह उत्तर दिलं.
