मुंबई – अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन एक महिना उलटला तरी तपास लागलेला नाही. याबाबत राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असताना नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचे राजकारण करू नये असे आवाहन त्यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारवर तोफ डागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रश्नी तपास करण्यास सरकारला अपयश आले आहेत. या हत्याप्रकरणीसरकारबाबत संशय निर्माण होत आहे. त्यांचाच हात नाही ना, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.
दरम्यान, दाभोलकरांच्या हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे देण्याची मागणी आपण अजून केलेली नाही, तशी मागणी अजून दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली नाही. असे हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केले आहे.
अनिंसचे कार्यकर्त्यां नी गुरुवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज यांनी टीका केली. सरकारकडून दाभोलकर हत्या तपासप्रकरणी हालचाली दिसत नाहीत. दाभोलकरांच्या मारेक-यांच्या अद्याप तपास का लागला नाही, असा सवालही राज यांनी उपस्थित केला. राज यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली. ते म्हणालेत राज हे अनुभवावरून बोलत आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही हे प्रसिद्धीचे नाटक आहे, असे म्हटले होते.