
डेहराडून – उत्तराखंडातील सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचे खानपूर येथील आमदार कुंवर प्रणवसिंग उर्फ चॅम्पियन यांनी राज्याचे कृषिमंत्री हरकसिंग रावत यांच्या घरी पार्टी सुरू असताना गोळीबार केला. त्यात तिघे जखमी झाले. राज्याचे पोलीस महानिरीक्षक आर.एस. मीना यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. या घटनेत विद्यार्थी नेता विवेकानंद खंडुरी, हरिद्वार येथील एक अज्ञात तरुण असे दोघे जखमी झाल्याचे निश्चित कळते.
