डेहराडून – उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीत बेपत्ता झालेल्यांमध्ये 92 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांची सरकारने यादी जाहीर केली असून 4 हजार 120 जण बेपत्ता असल्याचे म्हटले आहे.

डेहराडून – उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीत बेपत्ता झालेल्यांमध्ये 92 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांची सरकारने यादी जाहीर केली असून 4 हजार 120 जण बेपत्ता असल्याचे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील सर्वाधिक म्हणजे 1 हजार 150 जण बेपत्ता असल्याचे अधिकार्यांनी आज मंगळवारी सांगितले. यामध्ये उत्तराखंडमधील 852, मध्य प्रदेशमधील 542, राजस्थानातील 511, दिल्लीतील 216, महाराष्ट्रातील 163, गुजरातमधील 129, हरियाणातील 112, नेपाळमधील 92, आंध्र प्रदेशातील 86, बिहारमधील 58, झारखंडमधील 40, पश्चिम बंगालमधील 36, पंजाबातील 33, छत्तीसगडमधील 29, ओरिसातील 26, तमिळनाडूतील 14, कर्नाटकातील 14, मेघालयमधील 6, चंदीगड येथील – 4, जम्मू-काश्मीरमधील 3, केरळमधील 2, तसेच पाँडेचरी व आसाममधील प्रत्येकी एक जण बेपत्ता असल्याचे या यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या नागरिकांमध्ये 421 मुलांचा समावेश आहे. विविध राज्यांमध्ये पोलिसांकडे दाखल एफआयआरवरून ही यादी तयार करण्यात आली आहे.