मुझ्झफरनगर दंगल, मोदींच्या नावाची घोषणा देणार काँग्रेसला संजीवनी

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील मुझफ्फर नगर येथे उसळलेली जातीय दंगल व त्याचवेळी दिल्लीत भाजपने नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेली उमेदवारी उत्तर प्रदेशात काँग्रेसला संजीवनी देणारी ठरेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

मुझफ्फरनगर येथे उसळलेल्या दंगलीत मुस्लीमांवर अनेक अत्याचार झाले असल्याचे समोर येत आहे. मात्र इतकी दंगल उसळूनही आठवड्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव या जिल्ह्याच्या भेटीवर आल्याने येथील दंगलग्रत मुस्लीम समाज त्यांच्यावर कमालीचा नाराज झाला आहे. त्यातच भाजपने मोदींच्या नावाची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्याने या नाराजीत भयाचीही भर पडली असल्याचे दिसून येत आहे. अशावेळी या जिल्ह्याच्या भेटीवर आलेले पंतप्रधान मनमोहनसिग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया व उपाध्यक्ष राहुल यांचाच आधार येथील मुस्लीम जनतेला वाटतो आहे. त्यांची भेट घेण्यासाठी झालेली गर्दी आणि त्यांच्याकडे न्याय मिळावा व मदत मिळावी यासाठी याचना करणार्यांलची संख्या यावरून हा अंदाज बांधला जात आहे.काँग्रेसबद्दलची मुस्मील समाजाची ही भावना दीर्घकाळानंतर पुन्हा दिसून आली आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.

एक काळ असा होता की पश्चिम उत्तर प्रदेशात मुस्लीम समाज काँग्रेसपासून दुरावला होता व त्याने समाजवादी पार्टीचा आश्रय घेतला होता. मात्र नुकतीच झालेली दंगल आणि मोदींचे नांव यामुळे हे चित्र पालटले आहे. याचा फायदा काँग्रेसला नक्कीच होणार असून त्यांना त्यामुळे उत्तर प्रदेशात जणू संजीवनीच मिळणार आहे. आपले रक्षण फक्त काँग्रेसच करू शकते ही भावना मुस्लीमांच्यात अधिक दृढ होऊ लागल्याचे नजरेस येत आहे. समाजवादी पक्षाचे सरकार बरखास्त करा अशी मागणी येथील जनतेने पंतप्रधानांकडे केली आहे. यावरून त्यांचा सपा सरकार वरचा विश्वास उडाला आहे हेच दिसून येत आहे.

Leave a Comment