पुणे : – महाराष्ट्र आणि विशेषत : पुणे आणि परिसरातील व्यावसायिक, पर्यटक, विद्यार्थी यांच्याकडून व्हिसासाठी येणारे वाढते अर्ज लक्षात घेऊन बेल्जियम सरकारने देशातील चौथे व्हिसा स्वीकृती केंद्र आज पासून येथे सुरु केले. एकट्या महाराष्ट्रातून वर्षाला दहा हजार व्हिसा अर्ज येतात अशी माहिती बेल्जियमचे वाणिज्य दूत कार्ल देन बॉश यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
पुणे रेल्वे स्थानकाजवळ सोहराब हॉल येथे हे केंद्र सकाळी आठ ते ४ . ३ ० या वेळेत सुरु राहणार असून २ ४ तासात व्हिसा अर्जावर प्रक्रिया केली जाणार आहे. राज्यातून येणारे अर्ज पाहता त्यातील ४ ५ टक्के अर्ज पुणे परिसरातून येतात अशी माहिती देऊन बॉश म्हणाले की व्ही एफ एस ग्लोबल च्या सहकार्याने हे केंद्र चालविले जाणार आहे. भारतात सहा ठिकाणी अशी केंद्रे सुरु केली आहेत. पुण्याच्या भागातील वाहन , माहिती तंत्रज्ञान , शिक्षण , पर्यटन या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात लोक बेल्जियमला जातात त्यांची यामुळे सोय होणार आहे . चेन्नई , अहमदाबाद, हैद्राबाद येथेही अशी केंद्रे आहेत .
गेल्या वर्षी पश्चिम आणि दक्षिण भारतातून व्हिसासाठी ३ ४ हजार अर्ज आले आणि त्यात वाढ होते आहे असे नमूद करून ते म्हणाले की महाराष्ट्रात बेल्जियमच्या ६ ५ कंपन्या कार्यरत आहेत यावरून उभय देशातील वाढता व्यापार लक्षात येतो.
टिन टिन , पी के अन वाटर्लुची लढाई
राजकुमार हिरानी यांचा पी के हा चित्रपट सध्या बेल्जियममधील ब्रुश या शहरात चित्रित केला जात असून तो २ ० १ ४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अनेक बॉलिवूड निर्माते बेल्जियमच्या रमणीय प्रांतात चित्रीकरणासाठी येतात. भारतातील वाढत्या मध्यमवर्गाला येथील संस्कृती आणि ऐतिहासिक स्थळे यांचे आकर्षण आहे. १ ८ जून १ ८ १ ५ मध्ये झालेली वाटर्लु लढाईचे ठिकाण राजधानी ब्रसेल्स पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. तेथेही लोक भेट देतात. लहान मुला त लोकप्रिय असलेल्या टिन टिन या कार्टून व्यक्तिरेखेचा उगम इथलाच कारण आमचा देश कॅपिटल ऑफ कॉमिक समजला जातो अशी रंजक माहिती भारत बेल्जियम ट्रेड चेंबरचे प्रमुख स्वेन द वाश्तर यांनी यावेळी दिली.