अमेरिकेत नौदलावर गोळीबार, १२ ठार

वॉशिंग्टन- अमेरिकेतील वॉशिंग्टन शहरातील नौदलाच्या मुख्यालयात सोमवारी झालेल्या गोळीबारात सात जण ठार झाले आहेत. या गोळीबारात दहा जण जखमी झाले असून त्यात एका पोलिस अधिका-याचा समावेश आहे . हा हल्ला कोणी केला याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही.

शहरातील नौदलाच्या मुख्यालयात सकाळी आठ वाजून 20 मिनिटांनी काही जणांनी गोळीबार केल्याचे नौदलाने म्हटले आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या पोलिस अधिका-याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

नौदलाच्या या मुख्यालयात तीन हजार जवान आणि नागरिक काम करतात. विशेष म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस आणि कॅपिटल हाऊसपासून नौदलाचे मुख्यालय अगदी जवळ आहे. या हल्ल्याचे अपडेट अध्यक्ष बराक ओबामा यांना देण्यात येत असल्याचे नौदलाने म्हटले आहे.