करीना-सैफ बॉक्स ऑ‍फीसवर आमने-सामने

विवाह करून अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानला एक वर्षाचा कालावधी लोटला मात्र आतापर्यंत त्यांच्यात कसलीच तक्रार झाली नाही. मात्र आगामी काळात करीना-सैफ या जोडीचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येत आहेत. त्यामुळे यामध्‍ये आता कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात करीना-सैफ या जोडीमध्ये रिलीज करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये़ वाद होण्याची शक्यता आहे करीना कपूरचा ‘गोरी तेरे प्यार’ हा सिनेमा व सैफ अली खानचा बहूचर्चीत ‘बुलेट राजा’ आगामी नोंव्हेबर महिन्यात एका आठवडयानंतर एक असे रिलीज होत आहेत. त्यामुळे या सिनेमाचा परिणाम एकमेकाच्या सिनेमावर होणार असल्याने त्यांच्या‍त वाद होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून करीना-सैफ दोघेपण त्यांच्यान सिनेमाच्या प्रमोशनमध्येस बीजी आहेत. त्यायमधून दोघांना सघ्या तरी वेळ मिळत नाही. मात्र आगामी काळातील त्यांची रिलीज डेट पाहता त्यांच्यात मतभेद होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सैफ अली खानने कधीच करीना कपूरच्या‍ प्रोफेशनल लाइफमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळेच आता सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment