बॉलीवुडची सेक्सी आणि ग्लैमरस अभिनेत्रीपैकी एक असलेली कंगना रानावत सध्या आगामी काळात येत असलेल्या तिच्या “रिवॉल्वर रानी” या सिनेमामुळे चर्चेत आहे. कंगना या सिनेमातून आव्हानात्मक रोल करताना दिसणार आहे.

बॉलीवुडची सेक्सी आणि ग्लैमरस अभिनेत्रीपैकी एक असलेली कंगना रानावत सध्या आगामी काळात येत असलेल्या तिच्या “रिवॉल्वर रानी” या सिनेमामुळे चर्चेत आहे. कंगना या सिनेमातून आव्हानात्मक रोल करताना दिसणार आहे.
याबाबत बोलताना अभिनेत्री कंगणा रानावत म्हणाली, ‘आतापर्यंत सिनेमात काम करीत असताना वेगळया स्वरूपाचे रोल केले आहेत. मात्र या सिनेमातील माझा रोल थोडासा आव्हानात्मक आहे. माझ्यासाठी हा रोल खास असून यापूर्वी हा रोल अभिनेत्री तब्बू साठी ऑफर करण्यात आला होता. तिने हा रोल करण्यास नकार दशविल्याने हा रोल मला मिळाला आहे. ‘
तसे पाहिले तर ‘तनु वेड्स मनु’ या सिनेमातील रोल पाहून काही लोक खूपच आंनदीत झाले आहेत. त्यामधील माझी भूमीका सर्वांना आवडली आहे. आगामी काळात येत असलेल्या “रिवॉल्वर रानी” या सिनेमाचे दिग़दर्शक साईं कबीर असून निर्माता तिग्मांशु धूलिया आणि राहुल मिश्रा आहेत. ‘शूटआउट एट वडाला’ मधील आव्हानात्माक भूमीकेनंतर या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने कंगणा सध्या खूष आहे.