बदलापूर: बदलापूरमध्ये शालेय शिक्षण घेत असलेल्या चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. शाळेतून घरी येणा-या मुलीवर बसमधील क्लिनरनेच बलात्कार केला. ही घटना रविवारी उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

सहा सप्टेंबरला ही मुलगी लक्ष्मी ट्रॅव्हल्समधून घरी येत होती. बस चालकाने मुलीला घरी सोडले मात्र, क्लीनर संदीप किरवे याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून पुन्हा बसमध्ये आणले आणि तिच्यावर बलात्कार केला.या प्रकाराबाबत घरी सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही त्या बसमधील क्लिनरने दिली होती.
हा प्रकार घडल्यानंतर काही दिवसांनी मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये घेवून गेल्या नंतर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांत तक्रार केल्याने आरोपी संदीप किरवेला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी लक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसची तोडफोड केली.