प्रीती झिंटा विरूद्ध अजामीनपात्र वॉरंट!

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पुन्हा एकदा एका वेगळ्या वादात अडकली आहे. मुंबईच्या अंधेरी कोर्टाने प्रीतीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चेक बाऊन्स प्रकरणी प्रीती झिंटाला हे वॉरंट बजावण्यात आले आहे.

लेखक अब्बास टायरवाला यांनी प्रीतीविरुद्ध चेक बाऊन्स झाल्याची तक्रार दाखल केली होती. तब्बल 18 लाख 90 हजार रुपयांचा हा चेक बाऊन्स झाला. यावर प्रीतीला कोर्टात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु, कोर्टाने बजावल्यानंतरही सलग चौथ्यांदा प्रीती कोर्टात हजर झाली नाही. त्यामुळे तिला अजामीनपात्र वारंट बजावण्यात आले आहे.

Leave a Comment