टीसीएस जगातील दोन नंबरची व्हॅल्युएबल कंपनी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा पुरवठादार कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस या भारतीय कंपनीने जगातील दोन नंबरची व्हॅल्युएबल कंपनी बनविण्याचा मान पटकावला असून या स्पर्धेत तिने अॅक्सेंच्युअर व हेलवर्ड पेकार्डला मागे टाकले आहे. पहिल्या क्रमांकावर मात्र अजूनही आयबीएमनेच हक्क सांगितला आहे.

टीसीएसचे मूल्य ६० अब्ज डॉलर्सवर पोहोचले असताना अॅक्सेंच्युअर व एच पी यांचे मूल्य अनुक्रमे ५०.५ व ४३ अब्ज डॉलर्स इतके मोजले गेले आहे. लिडर आयबीएमचे मूल्य २०२.६ अब्ज इतके आहे. पाच वर्षांपूर्वी टीसीएच चा बाजार हिस्सा २८ टक्के इतका होता तो यंदा ४७ टक्क्यांवर गेला आहे व या कंपनीने फास्टेट ग्रोईंग फर्म अशी ओळख निर्माण केली आहे असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आर्थिक आव्हाने पेलूनही या कंपनीने आपला नफा कायम ठेवण्यात यश मिळविले असल्याचे वरीष्ठ विश्लेषक शशीभूषण यांचे म्हणणे आहे.

टीसीएस महसूल, नफा आणि मार्केट व्हॅल्युएशन सर्वाधिक असलेली कंपनी ठरली आहे. जाणकारांच्या मते याचा थेट फायदा कंपनीला होत नसला तरी त्यातून अनेक इनडायरेक्ट फायदे कंपनीला मिळत आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेणे यामुळे कंपनीला शक्य झाले असून त्याचा थेट फायदा कंपनीला होत आहे. कंपनीत कर्मचार्यांयची संख्याही २,८०,००० इतकी असून आयबीएम कंपनीत ४,३०,००० कर्मचारी काम करतात.