भारतीय नारी लय भारी

मुंबई – जगातील प्रभावशाली महिलांत भारतीय नारीही आता मागे नाही हे सिद्ध होत असून अतिश्रीमंत महिलांची संख्या भारतात यंदाच्या वर्षात १२५० वर जाऊन पोहोचली आहे. या अतिश्रीमंत महिलांची एकूण संपत्ती ९५ अब्ज डॉलर्स म्हणजेच ६.०२ लाख कोटी रूपये इतकी आहे. विशेष म्हणजे ही संपत्ती जगातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीच्या तुलनेत १० टक्के इतकी आहे. ग्लोबल फायनान्शियल सर्व्हीसेस कंपनीच्या वर्ल्ड अल्ट्रा रिपोर्टनुसार तर भारतीय अतिश्रीमंत महिलांच्या संपत्तीचा वाटा १६ टक्के असल्याचे म्हटले गेले आहे. हा अहवाल बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भारतापाठोपाठ अतिश्रीमंत महिलांच्या यादीत चीनचा क्रमांक असून तेथे हे प्रमाण १५ टक्के इतके आहे. सर्वात तळात श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या सौदी अरेबियाचा क्रमांक असून येथे श्रीमंत महिलांचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. हा अहवाल यंदा प्रथमच लिंगभेदासह प्रसिद्ध केला गेला आहे. ज्यांची वैयक्तीक संपत्ती ३० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १९० कोटी रूपयांच्या पुढे असते त्यांचाच समावेश या यादीत केला जातो असे समजते.

या अहवालात या अतिश्रीमंतांची नांवे नाहीत तसेच ही संपत्ती त्यांना कोणत्या मार्गाने मिळाली याचाही उल्लेख नाही. भारतात अतिश्रीमंतांची एकूण संख्या ७८५० इतकी असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात १२० ने वाढ झाली आहे व मालमत्तेत ५९.३५ लाख कोटींनी वाढ झाली आहे. ब्रिक म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया आणि चीन या देशात भारतातील श्रीमंत संख्येने अधिक आहेत व महिलांत दिल्ली आणि मुंबई या शहरातील महिला अधिक संख्येने म्हणजे ५० टक्के आहेत. मात्र विशेष असे की या संपत्तीतून मालमत्ता दान करणार्यांहतही या महिला आघाडीवर असून हे प्रमाण १०.६ टक्के इतके आहे.

जगात अतिश्रीमंतांची संख्या १,९९,२३५ इतकी असून त्यांची एकूण मालमत्ता आहे २७.८ ट्रिलियन डॉलर्स.

Leave a Comment