अ‍ॅपलचे स्वस्त मोबाईल बाजारात दाखल

वॉशिंग्टन- सॅमसंगच्या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी अ‍ॅपल कंपनीने आयफोन 5एस’ आणि आयफोन 5 सी’ हे दोन स्वस्त आयफोन बाजारात आणले आहेत. प्लॅस्टिक बॉडी असलेले हे फोन अन्य हँडसेटच्या तुलनेत स्वस्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आयफोन 5 सी’ हँडसेटमध्ये आठ मेगापिक्सल कॅमेरा, 1.9 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा, 4 जी, वायफाय अशा सुविधा आहेत. तो निळा, पिवळा, हिरवा, गुलाबी आणि पांढरा अशा पाच रंगामध्ये उपलब्ध आहे. या फोनच्या 16 जीबी क्षमतेच्या मॉडेलची किंमत 6300 रुपये तर 32 जीबी क्षमतेच्या मॉडेलची 13 हजार रुपये इतकी आहे.

आयफोन 5 सी’ मध्ये फिंगरप्रिट सेन्सर लावण्यात आला आहे. या फोनच्या 16 जीबी क्षमतेच्या मॉडेलची किंमत 13 हजार रुपये, तर 32 जीबी क्षमतेच्या मॉडेलची किंमत 26 हजार रुपये असेल. या दोन्ही हँडसेट्सची बुकिंग 13 सप्टेंबरपासून सुरू होणार असून ते डिसेंबर महिन्यात भारतात उपलब्ध होणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.

Leave a Comment