पुणे – सोमवार पासून दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू राहणार आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच हा उत्सव शांततेने पार पडावा यासाठी पुणे पोलिसही सज्ज झाले आहेत. या संदर्भात पुणे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी चिंचवड येथे नुकतीच गणेश मंडळ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात दहशतवादी कारवाया होण्याचा धोका असल्याने गणेश मंडळ कार्यकर्त्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी अशा सूचना पोळ यांनी दिल्या आहेत. आसपास कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा बेवारशी वस्तू आढळल्यास ताबडतोब पोलिसांची संफ साधण्याचे आवाहन केले गेले आहे. पोलिसांनी यंदाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतून विशेष युवा कार्यकर्ते निवडले असून हा कार्यक र्ते पोलिस मित्र म्हणून काम पाहणार आहेत. अशा ३ हजार पोलिस मित्रांना प्रशिक्षण दिले गेले आहे.
पुण्याच्या झोन तीन विभागात १३०० मंडळे आहेत. या भागातही सामाजिक, स्वयंसेवी तसेच अन्य संघटनांचे सदस्य असलेल्या ३ हजार जणांना पोलिस मित्र म्हणून प्रशिक्षण दिले गेले आहे. या पोलिस मित्रांना टी शर्ट, टेाप्या आणि ओळखपत्रेही दिली गेली असल्याचे समजते.