आता दीपिका करणार हॉलीवूडचा सिनेमा

दिवसेंदिवस हॉलीवूडच्या सिनेमात काम करणा-यांची लिस्ट वाढत चालली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन, मल्लिका शेरावत या बॉलीवूडमधील अभिनेत्रींनी हॉलीवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. आता यांमध्ये ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशाचा आनंद घेत असलेल्या दीपिकाचेही नाव जोडले गेले आहे. हॉलीवूडच्या ‘फास्ट अण्ड फ्युरियस’ या सिनेमाच्या सिक्वलमध्ये दीपिका काम करणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात ‘फास्ट अण्ड फ्युरियस’ या सिनेमाच्यां सातव्या सिक्वलमध्ये अभिनेत्री दीपिका व्हिन डिसेलसोबत काम करताना दिसणार आहे. तसेच, दीपिकासह जॅसन स्टॅथम आणि ड्‌वेन जॉन्सन हे हॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते या सिनेमात काम करणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशाचा आनंद सध्या दीपिका घेत आहे. तिच्यात या सिनेमाने दोनशे कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे. दीपिका गेल्याआ काही दिवसांपासून दुबईमध्ये फराह खानच्या ‘हॅपी न्यू इयर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच, ती आगामी काळात लवकरच सिनस्टार रजनीकांतसोबत तमिळ ‘कोचादैय्या’ या सिनेमात दिसणार आहे.

Leave a Comment