हफिज सईदच्या नेतृत्त्वाखाली पाकमध्ये भारत विरोधी रॅली

इस्लमाबाद – आज म्हणजे शुक्रवारपासून मुंबई बॉम्बस्फोटातील मास्टर माईंड तसेच लष्करे तैय्यबा या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईद याच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानात भारत विरोधी रॅली सुरू होत आहे. जमात उल दावा या लष्करेच्याच सहयोगी संघटनेने या रॅलीचे आयोजन केले आहे.

भारत पाक सीमेवर गेले कांही दिवस होत असलेल्या गोळीबारामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. भारताचा निषेध करण्यासाठी हफिजने ही रॅली काढली असून त्यात सामील होण्याचे जमात उल दावा सह अन्य राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांनाही आवाहन केले गेले आहे. दफाई पाकिस्तान कारवाँ या नावाने काढल्या जात असलेल्या या रॅलीची सुरवात रावळपिंडीतून होत असून इस्लामाबाद येथे ही रॅली सार्वजनिक सभा झाल्यानंतर समाप्त होणार आहे. हजारो कार्यकर्ते या रॅलीसाठी जमले असल्याचा हफिज याचा दावा आहे. त्याने हुरिर्यतच्या नेत्यांनाही रॅलीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे.