जोधपूर : आध्यात्मिक गुरु आसाराम बापूचे कारनामे आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. कारण आसाराम यांचा सेवक असलेल्या शिवाच्या मोबाइलमधून आता आसाराम यांच्या लीलासमोर येत आहेत. शिवाच्या मोबाइलमधल्या एका क्लिपमध्ये आसाराम हे एका मुलीसोबत असल्याचे समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या सर्व प्रकारामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
शिवाच्या मोबाइलमधल्या एका क्लिपमधून आसाराम हे एका मुलीच्या खांद्यावर आणि मानेवर हात फिरवत असताना दिसत आहेत, त्यामुळे आसाराम यांच्याविरोधात पोलिसांना मोठा पुरावा मिळाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, आसाराम यांनी आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी महिला डॉक्टरची मागणी जेलकडे केली आहे. शिवाय या महिला डॉक्टरनं पुढचे आठ दिवस किमान रोज दोन तास आपली सेवा करावी, अशीही मागणी पत्रातून केली आहे. खाणं-पिणं, औषधं आणि कपडे हे आपल्या आश्रमातून मिळावेत अशीही मागणी केली आहे. आसाराम यांचे हे पत्र पोलिसांनी कोर्टात पाठवले आहे. ज्यावर आजच्या सुनावणीत विचार केला जाणार आहे.