माझ्यावर काहीही फरक पडत नाही-दीपिका

‘रणबीर कपूर कुणाबरोबर डेटला जातो… कुणाबरोबर लग्न करतो.. याबद्दल मला काहीही ऐकायचे नाही. सगळ्यांनाच स्वताचे खासगी जीवन असते. ते कसे जगायचे हे त्यानीच ठरवावे. रणबीर आणि कतरीनाच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींनी आपल्यासाठी काहीच महत्त्वाच्या नाहीत. माझ्यावर त्याकचा काहीही फरक पडत नाही.’ असे अभिनेत्री दीपिका पादूकोनने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या साखरपुड्याच्या चर्च्यांना उधाण आले आहे. साहजिकच, यावर रणबीरची पूर्व गर्लफ्रेंड दीपिका पादूकोन हिची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

दीपिका पादुकोन ही सध्या बॉलिवूडमधल्या ‘नंबर वन हिरोइन’ असण्याचा आनंद घेते आहे. ती तिच्या सिनेमांसोबत रणबीर कपूरशी असलेल्या नात्याबद्दलही चर्चेत राहिली. रणबीर आणि कतरीनाचे नाव जोडले गेल्यानंतर तर या चर्चेला जास्तच उधाण आले. दीपिका, कतरीना आणि रणबीर या तिघांचा लव्ह ट्रँगल सध्याचा हॉट टॉपिक बनला आहे.

Leave a Comment