लातूरात शेतक-याकडे १३०० कोटी थकबाकी

लातूर- लातूरसह परिमंडळातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृषिपंपधारकाची संख्या तीन लाख ८८ हजार आहे. लातूर जिल्ह्यात एक लाख नऊ हजार ग्राहकांकडे ३३० कोटी २६ लाख थकबाकी , उस्मानाबाद जिल्ह्यातील एक लाख २९ हजार ग्राहकांकडे संख्या ४६४ कोटी पाच लाख थकबाकी , बीड जिल्हा एक लाख ४९ हजार वीजग्राहक ५३८ कोटी १२ लाख रुपये थकबाकी आहे.

महावितरणला वेळेवर महसूल न मिळाल्याने कंपनीसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. वीज बीलाच्या बाबतीत तक्रार असल्यास संबंधित उपविभागाशी संपर्क साधावा त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत वीजबील भरल्याशिवाय खंडित वीज पुरवठा पुर्ववत केला जाणार नाही असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. ग्राहकांच्या दारापर्यंत वीज आणायला महावितरणला सरासरी पाच रुपये ५६ पैसे इतका खर्च येत असताना शेतकऱ्यांना ५० पैसे युनिट इतक्या माफक दराने वीज पुरवली जाते. तरीही वीजबील भरण्याच्या बाबतीत कृषिपंपधारकाची उदासिनता दिसून येते.

कृषिपंप वीज पुरवठ्याचे ट्रान्सफार्ममर जळाल्यास , नादुरुस्त झाल्यास त्याचे पुर्नव्यवस्थापन करण्यासाठी नियमानुसार त्या ट्रान्सफार्ममरवरील किमान ८० टक्के वीज बील भरणे अपेक्षीत असते त्याशिवाय जळालेले ट्रान्सफार्ममर दुरुस्त करुन दिले जात नाही. इतर वर्गवारीच्या तुलनेत कृषिपंपाचे ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यासाठी १०० टक्के वसुली हाच एकमेव पर्याय महावितरण कंपनीकडे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.