नाशिक- मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर आहेत. या दौ-यात ते काही विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. त्यांसोबतच आगमी लोकसभेच्या पार्श्वी-भूमीवर ते उमेदवारांची चाचपणी करणार असल्याचे बोलले जात आहे.

गंगापूर धरणाचे जलपूजन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याल दौ-याची सुरूवात होणार आहे. नाशिकमध्ये ते विविध विकासकामांची पाहाणी करणार आहेत. नाशिक महापालिका मनसेच्या ताब्यात आहे. विविध वॉर्डातून फिरून ते विकास कामांचा आढावा घेणार आहेत.
त्यासोबतच जळगाव पलिका निवडणूकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार ते करणार आहेत. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. एकूणच शहरातील विकास कामांबाबत मनसेवर टीका होत असतांना ठाकरे यांचा हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे.