नवी दिल्ली – मर्सिडीजच्या ए क्लास कॉम्पॅक्ट लक्झरी कारला उत्तर म्हणून बीएमडब्ल्यू ने त्यांची बीएमडब्ल्यू वन सिरीज भारतात नुकतीच सादर केली असून डिझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये या कार उपलब्ध करून दिल्या आहेत. चेन्नई येथील कंपनीच्या प्रकल्पात या गाड्या असेंबल केल्या जाणार आहेत
कंपनीतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल सिरीज गाडी लिटरला १६.८ अॅव्हरेज देइल तर डिझेल गाडी लिटरला २१ किमी अॅव्हरेज देईल. या गाड्यांचे प्री बुकींग महिन्यापूर्वीच सुरू करण्यात आले असून पहिल्या १०० ग्राहकांना सर्व्हीस पॅकेज कॉम्प्लीमेंटरी म्हणून दिले जाणार आहे. या गाड्यात अनेक आधुनिक सुविधा दिल्या गेल्या आहेत. इलेक्ट्रीक सीट मेमरी, इलेक्ट्रीक ग्लास रूफ, पार्क डिस्टन्स कंट्रोल, इलेक्ट्रीक पॉवर स्टीअरिंग अशा सुविधांच्या त्यात समावेश आहे.
पेट्रोल वन २०.९ लाखांत, डिझेल वन २२.९ लाख रूपयांत उपलब्ध असून डिझेल स्पोर्टसलाईन २५.९ तर डिझेल स्पोर्टसलाईन प्लस २९.९ लाख रूपयांना आहेत. या सर्व किमती एक्स शोरूम आहेत.