फेडरर पराभूत; नदाल क्वार्टरफायनलमध्ये

न्यूयॉर्क- अमेरिकन ओपनमध्ये रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसला आहे. चौथ्या फेरीतच फेडररचे आव्हान संपुष्टात आले. स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोने फेडररचा पराभव केला. त्यामुळे फेडररचे चाहतेही नाराज झाले आहेत. दुसरीकडे स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने मात्र क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोनं फेडररवर मात करत त्याला ७-६, ६-३, ६-४ अशा तीन सेट्समध्ये हरवले. या सामन्यात फेडरर जिंकला असता तर राफेल नदालसोबत क्वार्टरफायनलमधे त्याची लढत झाली असती. पण फेडररच्या पराभवामुळे आता ती शक्यताही मावळली आहे. या सामन्यात माझी कामगिरी खराब झाल्याचे, फेडररने सांगितले. त्यामुळे फेडररचे चाहतेही नाराज झाले आहेत.

अमेरिकन ओपन स्पर्धेत दुसरे मानांकन देण्यात आलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने मात्र क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केलाय. नदालने चौथ्या फेरीत जर्मनीच्या फिलीप कोल्हश्रेबर याचा पराभव केला. चौथ्या फेरीत फेडररचा पराभव झाल्याने नदालचा क्वार्टरफायनलमध्ये स्पेनच्याच टॉमी रोब्रेडो याच्याशी सामना होईल.