‘दुनियादारी’ सिनेमाची घोडदौड सुरूच

सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित ‘दुनियादारी’ सिनेमाची घोडदौड सुरू आहे. ‘दुनियादारी’ सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदा. ‘दुनियादारी’ सिनेमाचा ८ वा आठवडा सुरू असूनही शोचे ६० टक्के बुकिंग फुल्ल आहे आणि सिनेमानने आत्तापर्यंत जवळपास २५ कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे.

‘दुनियादारी’ सिनेमात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार अशी तगडी स्टारकास्ट आहेत. त्यामुळेच ‘दुनियादारी’ सिनेमा पहिल्या दिवसापासूनच हाऊसफूल झाला होता. पहिल्या पाच दिवसांतच दीड कोटीहून अधिक गल्ला जमवणारा ‘दुनियादारी’ प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल पसंतीस उतरला.

हॉलीवूड आणि थेट बॉलीवूडलाही मागे टाकत ‘टॉप १०’ सिनेमात दुनियादारी सिनेमाने स्थान मिळवले. या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून विक्रमी घोडदौड सुरू आहे. सध्या केलेला२५ कोटी रुपयांचा बिझनेसमध्ये लवकरच आणखी काही वाढ होणार आहे.

Leave a Comment