दररोज नवा भ‘ष्टाचार व रुपयांचे कोसळणे हाच केंद्र सरकारचा नवा परिचयˆ – राजनाथ सिंह

पुणे,ˆ दररोज नवी समस्या, नवा भ‘ष्टाचार आणि अधिक दारुण आर्थिक स्थिती अशी अवस्था विद्यमान केंद्रातील कॉग‘ेससरकारची झाली आहे. आणि दुसर्‍या बाजूला चीन व पाक संयुक्त आक‘मक पवित्र्यात आहेत, असे भाजपाचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी पुण्यात भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, स्वत: अर्थतज्ञ असलेले पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह हेसद्य परिस्थितीतील समस्येसाठी एका बाजूला जागतिक अर्थिक परिस्थितीला जबाबदार धरत आहेत व दुसर्‍या बाजूला विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरत आहेत, कोळसा प्रकरण, कॉमन वेल्थ गेम प्रकरण आणि टू जी स्पेक्ट्रम प्रकरण अशी अनेक प्रकरणे केलेल्या सरकारच्या हातात सध्या फक्त दुसर्‍यावर दोष देणे शिल्लक राहिले आहे.

श्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले, नऊ वर्षापूर्वी या देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते, तेंव्हा देशाची आर्थिक स्थिती ही शिल्लकीची होती. आज ती केवळ कर्जबाजारी आहे असे नव्हे तर दारुण अडचणीची आहे. रुपयाची डॉलरबरोबर असलेली स्थिती सत्तरच्या दिशेने निघाली आहे आणि गेल्या काही दिवसात जी पडझड झाली त्याचा वेग परिस्थितीवर नियंत्रण नसल्याचे द्योतक आहे.

डॉलर महाग झाल्याचा परिणाम म्हणून निर्यात वाढू शकते पण येथे तर आयात वाढत आहे, असे संागताना ते म्हणाले, सध्या निर्यात मर्यादित वाढली आहे पण आयात तुफान वाढत आहे. या दोन्हीतील अंतर वीस कोटी डॉलर येवढे झाले आहे. बावीस वर्षापूर्वी चंद्रशेखर पंतप्रधान असताना देशातील सोने विदेशात गहाण ठेवून दैनंदिनी खर्च भागविण्याची स्थिती होती पण सध्या त्यापेक्षा गंभीर स्थिती आहे कारण सरकार सोने गहाण ठेवण्याची भाषा करण्याची भाषा करत नाही आहे तर सोने विकण्याची भाषा करत आहे.

आयात निर्यातीबाबत ते म्हणाले, विदेशी व्यापारासंदर्भात आपल्याकडे फक्त पाच महिन्याला लागेल येवढेच विदेशी चलन आहे ही फार गंभीर स्थिती आहे सर्वसाधारणपणे ही रक्कम पंधरा महिन्याच्या खर्चायेवढी असावी लागते. अटलजींच्या काळात कायम पंधरा महिन्याची शिल्लक असे. परराष्ट्रनीती आघाडीवर तर दारुण फजिती सुरु आहे, असे सांगताना ते म्हणाले, चीनने भारताला चारही बाजूंनी घेरले आहे. आणि पाकिस्तान दररोज दहशतवादातून दररोज एक नवी कुरापत काढत आहे. पाकिस्तानला ठाम शब्दात उत्तर देण्याची हिंमत या सरकारकडे नाही. देशातील शेतकरी पुन्हा शेतीमालाला भाव न मिळण्याच्या संकटात आल्याने शेतकरी पुन्हा आत्महत्या करण्याच्या भीतीत आहे, असा पार्श्वभूमीवर या सर्व आघाडीवर भाजपा सरकारे देशात दमदार विकासाचा कार्यक‘म राबवत आहेत, असेही त्यांनी सांगितले.