इस्लामाबाद – पाकिस्तान व अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या अमेरिकेच्या सैन्यतळावर सोमवारी पहाटे आत्मघातकी बॉम्बर्सनी हल्ला चढविल्याचे वृत्त आहे. या हल्याची जबाबदारी तालिबानी संघटनेने स्वीकारली असून या दहशतवाद्यांनी नाटो फौजांची वाहतूक सुरू असलेला महत्त्वाचा रस्ता बंद पाडला असल्याचेही समजते.
हल्ला झालेल्या नांगरहार भागातील राज्यपालांचे प्रवत्ते अहमद सिया अब्दुलझाई या संबंधात म्हणाले की तोरखम भागात हा हल्ला झाला असून नाटो व अफगाणी फौजांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. या भागात गोळीबार व बॉम्बस्फोटांचे अनेक आवाज आले असले तरी मृतांबाबत अद्यापी माहिती मिळालेली नाही. दहशतवाद्यांनी नोटो फौजांच्या वाहतुकीचा तोरखाम हायवे बंद केला आहे.
तालिबानी प्रवत्ता झबिउल्लाह मुजाहिद याने नोटो फौजांचे अनेक रणगाडे उध्वस्त केल्याचा दावा केला असून या हल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले आहे.