करिनाचा ‘किसींग सीन’ला नकार

सैफसोबत लग्न झाल्यानंतर करिनाने तिच्या कामात बदल घडवून आणला आहे. पतौडी घराण्याची सून असलेल्या करिनाला आता वाईट वाटेल असे कोणतेही दृश्य चित्रीत करायचे नाही आहे, अशी माहिती सूत्राने दिली. त्यामुळेच करिनाने ‘सत्याग्रह’ सिनेमात अजय देवगणसोबत ‘किसींग सीन’ करण्यास नकार दिला आहे.

अभिनेत्री करिना कपूर तिच्या अभिनयासाठी आणि स्टाईलसाठी नेहमीच नावाजली जाते. पण, ‘सत्याग्रह’ सिनेमातील ‘रससे भरे तोरे नैना सावरिया’ या गाण्यात करिनाने अजयला किस करायचे होते. मात्र, सैफशी लग्न झाल्यानंतर करिनाने असे कोणतेही दृश्य शुट केले नाही. त्यासमुळे करीनाने अजय देवगणसोबत ‘किसींग सीन’ करण्यास नकार दिला.

तसे पाहिले तर लग्नापूर्वी करिनाने विशाल भारद्वाजच्या ‘ओमकारा’ सिनेमात अजयसोबत बोल्ड सीन शुट केले होते. तसेच, तिने आमिरसोबत ‘३ इडियट्स’मध्येही किसींग सीन दिला होता. हिरोइन चित्रपटात तिने अतिशय बोल्ड भूमिका साकारली होती. पण, आता तिने इतर सहकलाकारा सोबतही पडद्यावर बोल्ड सीन साकारण्यास नकार दिला आहे.