लवकरच…‘देखणी बायको दुसर्‍याची’

मराठी रंगभूमीला दर्जेदार नाटकांची परंपरा आहे. त्यातीलचं एक अत्यंत लोकप्रिय ठरलेले नाटक म्हणजे ‘देखणी बायको दुसर्‍याची’. लवकरच हे नाटक नव्या ढंगात नव्या संचात रंगभूमीवर दाखल होत असून सध्या या नाटकाची तालीम पुण्यात सुरू आहे. नव्या रूपात येणारे हे नाटक ‘ॐ साईनाथ प्रॉडक्शन’च्या बॅनरखाली बनत असून याची निर्माती आहे, मैथिली जावकर. अशोक पाटोळे लिखित या नाटकात स्वप्नील राजशेखर, संग्राम सरदेशमुख, रेणुका भिडे, मास्टर ओमकार बोरकर आणि मैथिली जावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाचे सूत्रधार सचिन जेस्ते असून दिग्दर्शक आहेत किशोर साव.

Leave a Comment