
बॉलीवूडमधील नट्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचे आईवडील नेहमीच लुडबूड करत असतात. चित्रपट निवडीपासून ते मानधनाचा आकडा ठरविण्यापर्यंत बहुतांश निर्णय तेच घेत असतात. आईवडिलांची अशी मदत मिळत असल्याने या नट्यांना सुरक्षित वाटत असले तरी कधी कधी त्यांचा हा हस्तक्षेप नुकसानकारकसुद्धा ठरतो. अभिनेत्री असीनच्या बाबतीत असेच घडले आहे. वडिलांच्या लुडबुडीमुळे तिच्या हातातून एक चांगला चित्रपट निसटला आहे.
काही दिवसांपूर्वी अनीस बाजमीचा चित्रपट वेलकमच्या सिक्वलमध्ये असीनची निवड झाल्याची खबर आली होती. मात्र अचानक तिचे नाव मागे पडून श्रुती हसनची या चित्रपटात वर्णी लागली. त्यावेळी यामागचे कारण कळू शकले नव्हते. मात्र आता अशी माहिती मिळाली आहे की, वेलकमच्या सिक्वलमधून असीनला वगळण्यास अन्य कुणी नाही तर तिचा पिता जोसेफ थोट्टमकुल हेच कारणीभूत ठरले आहेत. वेलकममध्ये काम करण्यासाठी जोसेफ यांनी आपल्या मुलीचे मानधन जरा जास्तच वाढविले होते.
