यासीन भटकळ आणि सतत वाढणारे दहशतवादी हल्ले

गेली दहा वर्षे भारतीय सुरक्षायंत्रणेला न सापडलेला इंडियन मुजाहिद्दिनचा अतिरेकी यासीन भटकळ बिहार:नेपाळ सीमेवर सापडला आहे. देशातील दहाहून अधिक राज्यात गेली आठ ते दहा वषर्ंे बॉम्बस्फोट मालिका घडविण्यात तो पोलिसांना हवा होता. त्यानेच पुणे शहराला दक्षिण भारतातील हालचालीचे एक महत्वाचे केंद्र बनविले होते. त्याला कर्नाटक पोलीस व केंद्र सरकारची (एन आय ए)नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी यानी नेपाळ सीमेवर अटक केल्याने गेली दहा वर्षे पुण्यात दहशतवादी कारवायांचे ठाणे उखडण्याची कोंडी फुटणार आहे. त्याच्या पुण्यातील काळात मूळ पाकिस्तानी व नंतर अमेरिकेत स्थिरावलेला हेडली यांने पुण्यातील विदेशी लोकांचे विशेष वास्तव्य असलेल्या कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये दि.13 फेब्रुवारी 2010 रोजी स्फोट घडविला, त्यात सतरा ठार व साठ जखमी झाले आणि नंतर जगंली महाराज रोडवर दि.1 ऑगस्ट 2012 रोजी एक स्फोट मालिका घडविली. यासीन भटकलचे वर उल्लेखिलेले स्फोट जसे महत्वाचे आहेत त्याच प्रमाणे त्याचे न घडलेले स्फोटही त्याही पेक्षा महत्वाचे आहेत. एक म्हणजे जर्मन बेकरी बरोबरच पुण्यातील अतिशय महत्वाचे मानले गेलेले श्रीमंत दगडू हलवाई गणपती मंदीर येथे न घडलेला स्फोट व जंगली महाराज रस्त्यावरील पाच घडलेल्या स्फोटाप्रमाणेच येथील खासदार सुरेश कलमाडी यांच्या पेट्रोलपंपावरील न झालेला बॉम्बस्फोट. एखाद्या पेट्रोलपंपावर असा स्फोट झाला तर आजूबाजूच्या एक किमी व्यासातील सार्‍या बाबी बेचिराख होण्याची शक्यता असते. जंगली महाराज रोडवरील तो पेट्रोलपंप हा तर शहराच्या महत्वाच्या भागातील होता. यातील दगडूहलवाई गणपती मंदिरातील स्फोट आयत्यावेळी संबंधित अतिरेक्याला स्फोटके ठेवण्यात यश आले नाही व त्या पेट्रोलपंपावर ठेवलेल्या स्फोटातील त्याला बत्ती दिले जाणारे स्फोटकच पेटले नाही, अशी कारणे घडली.

जेंव्हा ही प्रकरणे देशभर गाजत होती तेंव्हा दहशतवाद्यांना पैसे पुरविण्याची शक्यता व्यक्त होत असलेल्या तेलगी व हसन अली हे गुन्हे घडत होते. देशात दहशतवादी हल्ले घडू नयेत म्हणून सध्या पावलो पावली सुरक्षा यंत्रणा दिसते आहे. पुण्यापुरतेच बोलायचे झाले तर पुण्यात झालेल्या या स्फोटाबरोबरच देशात जेंव्हा जेंव्हा असे स्फोट झाले तेंव्हा तेंव्हा पुणे पोलीसांनी सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन,विमानतळ अशा रहदारीची ठिकाणे आणि मोठमोठ्या बाजारपेठा, हॉटेले, विद्यापीठे, महाविद्यालये, हजारो सहकारी गृहनिर्माण संस्था आणि छोटे मोठे कारखाने यांना त्यंाची सुरक्षा वाढविण्यास सांगितली. आज पुणे शहर आणि पुणे मुंबई मार्गावरील सर्व शहरे आणि नगरे येथील आस्थापनावरील सुरक्षा कर्मचार्‍यांची संख्या एक लाखावर आहे. अर्थात ही संख्या जशी पुण्यात आहे तशीच ती मुंबईत आहे आणि देशाच्या प्रत्येक राज्यात व प्रत्येक शहरात आहे. पण अशा दहशतवाद्यांच्या हालचाली काय आहेत त्यांच्याकडे कोणती साधने आहेत आणि त्यांच्या तपासात या मोठ्या मनुष्य बळाचा काय उपयोग होवू शकतो, याचा कसलाही विचार नसल्याने पुणे परिसरातील हे एक लाख सुरक्षा रक्षक आणि देशातील अशाच पद्धतीने उभे केलेले एक कोटीपेक्षाही अधिक सुरक्षा रक्षक ही बुजगावणी झाली आहेत. ज्या खर्चावर जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च होतात ते खर्च जर अशापद्धतीने अनुत्पादक केले जात असतील तर रुपयाची अवस्था दयनीय होणार नाही तर काय होणार ! नेपाळच्या सीमेवर आज यासीनला अटक झाली ती पोलिसांच्याच कौशल्याने पण एक कोटी सुरक्षा यंत्रण हाताशी असल्यावर ही कामे ज्या गतीने व्हायला हवीत, तशी न झाल्याने जेहादी दहशतवाद्यांनी जाहीर केलेले युद्ध सुरुच आहे. पाकिस्तानशी संधान आणि अलकायदाशी संधान असलेल्या भटकळचा पुण्यातील मुक्काम येथील पिंपरी चिंचवड भागातील एका भंगार साठवण्याच्या गोडावूनमध्ये होता. एकदा अटक झाल्यावरही पोलीसांच्या तावडीतून सुटून तो येथे पळून आला होता व जर्मनबेकरीचा स्फोट झाल्यावर पोलिसांना त्याचा सुगावा लागल्याने त्याने पुण्यातून मुक्काम हलविला. देशातील आठ राज्यात अशा स्फोट मालिकांचे यशस्वी व अयशस्वी प्रयत्न केले. त्याचा सर्वात अलिकडचा स्फोट म्हणजे बिहारमधील गयायेथील बौद्धमंदिरात घडविलेला स्फोट.

दहशतवाद्यांचे हे हल्ले सुरु होवून आता दहा वर्षे झाली आहेत. असे दहशतवादी हल्ले घडविण्याची सतत प्रक्रिया सुरु ठेवणार्‍या या अतिरेक्यांचे उद्दिष्ट काय असावे ? का ते माथेफिरू आहेत. अशी स्फोट मालिका घडविण्यासाठी हजारो हस्तक व शेकडो कोटी रुपये खर्च येत असतो व तो काही सहजपणे उपलब्ध होत नसतो. स्वातंत्र्यपूर्व काळातही असे हल्ले होत असत. तेंव्हा पाकिस्तान झाले पाहिजे, अशी मागणी असायची. नंतर काश्मीरसाठी अशी मागणी होवू लागली. पण सध्या जे हल्ले होत आहेत ते सन 1001पासून पहिली चारशे वर्षे गझनी भागातील म्हणजे सध्या अल कायदाचे मुख्यालय असलेल्या भागातून हल्ले होत राहिले आणि नंतरची चारशे वर्षे मोंगलांनी हल्ले केले. त्यांची लूट किती हा स्वतंत्र विषय आहे पण ब्रिटिशांची सत्ता गेल्यावर पुन्हा ते तसेच हल्ले वाढत आहेत. त्यांना तोंड देतील असे सुरक्षादलही उभे आहे पण त्यात सुसूत्रता आणली तरच ते हल्ले थांबणे शक्य आहे नाही तर एखाद्या भटकलच्या अटकेवरच समाधान मानावे लागेल. अर्थात हे युद्ध फक्त भारतापुरते मर्यादित नाही सार्‍या जगात त्याचा परिणाम जाणवत आहेश याचे उत्तर आपल्याला शोधावेच लागणार आहे.