इंडियन मुजाहिद्दीनचा मास्टर माईंड यासीन भटकळ जेरबंद

नेपाळ : इंडियन मुजाहिद्दीनला मास्टर माईंड व कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ याला भारत-नेपाळ सीमेवर गुरूवारी अटक करण्यात आली. मुंबईत १३/७ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट आणि पुण्यातील बॉम्बस्फोटचा तो मास्टर माईंड होता. यासीन भटकळ हा इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आहे. तो संस्थापक सदस्य आहे. यासीन भटकळने अनेक कारवायांमध्ये मास्टर माईंड म्हणून काम केले आहे.

पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट, दिल्ली, मेंगलोर स्फोट यात यासीन भटकळचा हात होता. यासीन भटकळ जेरबंद झाल्याने पोलिसांना मोठं यश आले आहे. पुण्यातील जंगली महाराजरोडवर जो ब्लास्ट झाला, यातही यासीन भटकळचा हात होता.यासीन भटकळ हा नेहमीच चकमा देत होता.

जर्मन बेकरीत बॉम्ब ठेवण्याचे कामही यासीन भटकळने केले होते. काही दिवसांपूर्वीच दाऊदचा हस्तक अब्दुल करीम टुंडाला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. त्यानंतर पोलिसांच्या हाती लागलेले हे मोठे यश आहे.