‘जग्गा जासूस’मध्ये रणबीर-कॅट पुन्हा एकत्र दिसणार

बॉलिवूडचे लव्हबर्ड्स रणबीर आणि कॅटरिना कैफ हे दोघे निर्माता अनुराग बासू यांच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण २०१४ मध्ये सुरु होणार होते, परंतु निर्मात्याला हा चित्रपट पुढच्यावर्षी प्रदर्शित करायचा असल्याने याच वर्षी या चित्रपटाचे चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. अनुराग आणि रणबीर या जोडीने यापूर्वी बर्फी सारखा सुपरहीट चित्रपट दिल्यानंतर ही जोडी पुन्हा या चित्रपटाव्दारे एकत्र येत आहे.यापूर्वी रणबीर आणि कॅटरीना हे दोघे ‘अजब प्रेम की गजब कहानी’ आणि ‘राजनीति’ या चित्रपटातून पडद्यावर एकत्र दिसले होते. तर ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात या दोघांची केमेस्ट्री पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहे.

Leave a Comment