रणबीरच आहे सुपरस्टार-करीना

बॉलीवूडमधील आघाडीच्या तीन खान सोबत काम करून अभिनेत्री करीना कूपरने सुपरहिट सिनेमात काम केले आहे. यावेळी तिच्या सोबत मनमोकळया गप्पा मारल्या असता तिने आगामी काळात रणबीर कपूरच सुपरस्टार असल्याचे सांगून टाकले आहे. यावेळी तिने हज्बंड सैफ, रणबीर-कटरीना आणि रितिक रोशनच्यास बाबतीत खुलेपणाने गप्पा मारल्या.

यावेळी बोलताना करीना म्हणाली, ‘विवाह झाल्यानतर माझ्यात आणि सैफमध्ये काहीच बदल झाला नाही, आजपण आमच्या रिलेशनशिप बदल झाला नाही. आम्ही पूर्वीप्रमाणेच आजही एकमेकावर प्रेम करतो. मी आतापर्यंत सर्वाधिक वेळ सैफ सोबतच घालवला आहे. मी सध्या वडिलांच्या रणधीर कपूरच्या प्रकतीकडे लक्ष देत आहे.’

आगामी काळात रणबीर कपूरच सुपरस्टार असल्याचे तिने यावेळी सांगून टाकले आहे. आगामी काळात मी रितिक रोशनसोबत ‘शुध्दी’या सिनेमात काम करीत आहे. यापूवी मी अनेक सिनेमात रितिक रोशनसोबत काम केले. रितिकसोबतची माझी जोडी प्रेक्षकांना पसंत पडली आहे. त्यामुळे ‘शुध्दी’ हा सिनेमा देखील प्रेक्षकांना आवडेल असे करीना म्हणाली.

Leave a Comment