पुण्यातील हॉस्पिटलची तोडफोड; चौघे जखमी

पुणे- पुण्यातील रुबी हॉस्पिटलची रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत रुबी हॉस्पिटलमधील चार कर्मचारी जखमी झाले आहेत मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या ५० ते ७५ नातेवाईकांनी हॉस्पिटलवर हल्ला केला.

मंगळवारी सकाळी मूत्रपिंड निकामी झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णाचे नातेवाईक संतापले. सकाळी आठच्या सुमारास ५० ते ७५ जणांच्या जमावाने रुबी हॉस्पिटलवर हल्ला केला. यात जमावाने रुग्णालयाच्या दर्शनी भागाची तोडफोड केली. तसेच जमावाला थांबवण्याचा प्रयत्न करणारे रुबी हॉस्पिटलमधील चार कर्मचारी या मारहाणीत जखमी झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान या घटनेनंतर तत्काळ घटनास्थाळी पोलिस दाखल झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. पुण्यातील डॉक्टरांनी रुबी हॉस्पिटलवर झाल्याचा तीव्र निषेध दर्शवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या सुरक्षीततेचा प्रश्न निमाण झाला आहे.

Leave a Comment