‘त्या’ नराधमांनी आणखी एका महिलेवर केला होता बलात्कार

मुंबई- मुंबई गँगरेप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी महिला फोटोग्राफरवरील बलात्कारापूर्वीही दुस-या एका महिलेसोबत गँगरेप केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मात्र याबद्दल आणखी दुजोरा मिळाला नाही.या पाचही आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

या सर्व आरोपींना पहिले घरांवर दरोडा टाकण्याच्या आरोपावरुन अटक झालेली आहे. त्यांच्याविरोधात याआधी लैंगिक गुन्ह्याबाबत तक्रार नोंदवल्या गेली नाही. महिला फोटोग्राफरवरील बलात्कारापूर्वीही दुसऱ्या एका महिलेसोबत गँगरेप केला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अद्याप याबद्दलची सविस्तर माहिती हाती आलेली नाही. मात्र मुंबई गँगरेप प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे.

राज्य सरकारने या लढ्यासाठी अड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, मुंबई पोलीस आता त्या मोबाईल फोनचा शोध घेत आहेत, ज्यात आरोपींनी या बलात्काराचे फोटो काढलेले आहेत. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. सर्वस्तरांतून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment