राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास विकास घसरेलˆ – मुख्यमंत्री

पुणे, – महाराष्ट्रात आगामी काळात जर त्रिशंकू सरकार आले तर विकासाची गाडी पुन्हा घसरेल, असी टिपणी मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. अनेक राज्यांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसल्यामुळे आघाडीचे सरकार चालवावे लागत आहे. त्यामुळे अपेक्षित असलेल्या वेगाने निर्णय घेता येत नाहीत. याचा परिणाम विकासावर होत असून विकासाकामांना खीळ बसत आहे. आगामी निवडणुकांमध्ये केंद्रात आणि राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या राज्याची विकासाची गाडी रुळावरून घसरेल, असेही त्यांनी बोलून दाखविले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भारताचा पुर्नशोध -राज्यांचा दृष्टीकोन’ या विषयावर मु‘यमंत्री चव्हाण बोलत होते. सर्व राज्यांच्या मु‘यमंत्र्यांचे या विषयावर भाषण आयोजित करण्यात येणार आहे. या मालिकेच्या पहिल्या पुष्पाला मु‘यमंत्री चव्हाण यांच्या भाषणाने सुरुवात झाली. या भाषणामध्ये मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राचा शाश्‍वत विकासाचा आराखडा मांडला.

यावेळी व्यासपीठावर पुणे इंटरनॅशनल सेंटरचे डॉ. रघुनाथ माशेलकर, विजय केळकर, दिलीप पाडगावकर, यशदाचे महासंचालक डॉ. संजय चहांदे उपस्थित होते.
यावेळी मु‘यमंत्री चव्हाण म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसल्यामुळे त्या ठिकाणी आघाडीचे सरकार चालवावे लागते. त्यामुळे सर्व पक्षांना विश्‍वासात घेवून निर्णय घ्यावे लागतात. लवकर निर्णय घेता नसल्यामुळे त्या ठिकाणचा विकासाचा वेग मंदावतो. महाराष्ट्र राज्य सध्या औद्योगिक क्षेत्रात क‘मांक एक वर आहे. पुढील काळात महाराष्ट्राला अग‘ेसर ठेवण्यासाठी कोरडवाहू जमिनी ओलिताखाली आणणे तसेच योग्य शहरीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रापेक्षा जगात फक्त 11 देश मोठे आहेत. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राने कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. राज्यात औद्योगिकीकरण समान पध्दतीने न होता. केवळ पाच जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकास एकवटला आहे. त्यामुळे विषम विकास झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा मु‘यमंत्री म्हणून आगामी काळात पाच विषयांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मु‘यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
विषम औद्योगिक विकास झाल्यामुळे निर्माण झालेले प्रश्‍न कमी करण्यासाठी समतोल औद्योगिक विकास करण्यात येईल. कापसावर 100 टक्के प्रकि‘या करण्यासाठी राज्यातच कारखाने उभारले जाणार आहेत. यासाठी राज्यातच वस्रोद्योग धोरण अवलंबिण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

ड्राय लॅन्ड मिशनसाठी 10 हजार कोटी
कोरडवाहू शेती ओलिताखाली आणण्यासाठी ड्राय लॅन्ड मिशन सुरू करण्यात येणार आहे. यासाठी 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच पाऊस कमी पडला आणि कृषी उत्पादन कमी झाले तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न होवू नये, यासाठी पुढील तीन वर्षांत 60 हजार कोटी रुपये खर्चांच्या योजना राबविल्या जाणार असल्याची माहिती मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

वॉकिंग टू वर्क ही संकल्पना राबविणार
एका विशिष्ट भागातच कारखाने एकवटले आहे. त्यामुळे काही भागांचा विकास रखडलेला आहे.कारखाने किंवा प्रकल्प हे अविकसित भागामध्ये स्थापन करण्यासाठी या कारखान्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच वॉकिंग टू वर्क ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यानुसार जेथे कारखाने आहेत त्याठिकाणी निवासी करणाची सोय करण्यात येणार आहे. औद्योगिक क्षेत्राच्या शेजारी नागरिकरणाला परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी नवे औद्योगिक धोरण आखण्यात येणार आहे.

सं‘येचा प्रश्‍न सुटला पण दर्जाचा प्रश्‍न निर्माण झाला
राज्यात यावर्षी अभियांत्रिकीच्या 40 टक्के तर व्यवस्थापनाच्या 60 टक्के जागा रिकाम्या राहिल्या आहेत. शिक्षण संस्थांच्या सं‘येचा प्रश्‍न सुटला. पण शिक्षणाच्या दर्जाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मु‘यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Comment