डॉ. निळकंठ कल्याणी अनंतात विलिन

पुणे, – ज्येष्ठ उद्योगपती डॉ. नीलकंठ कल्याणी यांच्या पार्थिवदेहावर केशवनगर, मुंढवा येथे रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध औद्योगिक, सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होते. मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

महाराष्ट्राच्या उद्योग विश्वात इतिहास घडविणारे डॉ. कल्याणी यांचे शनिवारी रात्री निधन झाले. कल्याणीनगर येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार गोपीनाथ मुंडे, महापौर वैशाली बनकर, आमदार बापू पठारे, मोहन जोशी, विनायक निम्हण, उल्हास पवार, अंकुश काकडे, चंद्रकांत छाजेड, कमल व्यवहारे, अभय छाजेड यांच्यासह उद्योजक अभय फि रोदिया, ललितकुमार जैन, लीला पूनावाला, एन. एम. वाडिया, अतुल किर्लोस्कर, बारी मल्होत्रा, माजी कि‘केटपट्टु चंदू बोर्डे, डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. के.एच. संचेती, माजी पालीस अधिकारी पी. एस. पसरिचा, के. के. कश्यप, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. पी. के. ग‘ट, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पोलीस आयु्नत गुलाबराव पोळ, जिल्हाधिकारी विकास देशमुख, डॉ. विश्‍वनाथ कराड, महादेव बाबर आदी मान्यवरांसह व त्यांचे कुटुंबिय नोतवाईक, उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डॉ. कल्याणी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानावरून केशनवनगर मुंढवा येथील त्यांच्या जागेत अंत्यविधीसाठी नेण्यात आले. तिथे साडेतीन वाजता लिंगायत समाजाच्या पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोबतच्या छायाचित्रात भाजपा नेते खा. गोपीनाथ मुंडे नीलकंठ कल्याणी यांना श्रद्धांजली अर्पण करताना

Leave a Comment