मुंबईत बलात्कारातील एका आरोपीस अटक

मुंबई – शक्ती मिल कंम्पाऊंडमध्ये झालेल्या सामुहीक बलात्कारातील पाच आरोपींपैकी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे अशी माहिती आज (शुक्रवार) पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तर या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून इतर चार आरोपींचेही नावे सांगितली आहेत असेही आयुक्त म्हणाले.

काल संध्याकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान एक तरुणी तिच्या सहकार्यासोबत महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवरुन शक्तीमिलच्या कम्पाऊंडमध्ये फोटोग्राफी करण्यासाठी गेली असता तीला दोन तरुणांनी इथे फोटो काढण्यास मनाई असल्याचे सांगितले. यानंतर या दोघांमध्ये वाद झाल्यावर आरोपींनी तरुणीला विचारपूस करण्यासाठी 20 फुट अतंरावर नेले. तर तिच्या सोबत आलेल्या सहकार्याला इतर आरोपींनी बेल्टने बांधूले आणि त्या तरुणीवर सर्वांनी मिळून सामुहिक बलात्कार केला. बलाक्तारानंतर ही तरुणी तिच्या सहकार्यासोबत रात्री 8 च्या समारास जसलोक रुग्णालयात दाखल झाली. तर पोलिसांना या घटनेची माहिती रात्री 8.30 च्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच पोलिस ताबडतोब घटनास्थळी पोहचली असून पोलिसांना आज सकाळी एका आरोपीस अटक करण्यास यश आले असल्याचे सत्यपाल यांनी सांगितले.
अटक झालेल्या आरोपींनी इतर आरोपींची नावे पोलिसांना सांगितली आहेत.

या सर्व फरार आरोपींविरुध्द 376 (ब), 341 या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या सर्व आरोपींचा पोलिस शोध घेत आहे, असे आयुक्त म्हणाले. तर या प्रकरणात मेडिकल तपासणी आणि फॉरेन्सिक चाचण्यांचेही काम सुरु झाल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली. हे सर्व आरोपी 20 वर्षे वयोगटातील असुन ते घटनास्थळाच्या आसपास राहणारे आहेत. पोलिसांनी या आरोपींच्या अटकेसाठी 20 पेक्षा जास्त पोलिसांचे पथक तयार केले असल्याचेही सिंह यांनी सांगितले. तर अटक झालेल्या आरोपीचे नाव सांगण्यात आयुक्तांनी नकार दिला आहे.

Leave a Comment