निसानची टेरानो एसयुव्ही भारतीय बाजारपेठेत

नवी दिल्ली – निसान मोटर कंपनीने टेरानो एसयुव्ही मोटारीची सुधारित आवृत्ती भारतीय बाजारात दाखल केली आहे.टेरानो सुव्ह ही कॉम्पॅक्ट स्पोर्ट युटीलिटी गटातील मोटार असून किफायतशीर कार खरेदी करणार्या गटावर लक्ष केंद्रित करून ही कार बाजारात आणली आहे.

टेरानो कार भारतीय बाजारपेठेत निसानची विक्री वाढवण्यास मदत करेल, असा कंपनीचा दावा आहे.कारण सध्या भारतीय बाजारात एसयुव्हीची मागणी वाढत असून सुटसुटीत एसयुव्ही मोटारीला बाजारपेठेत चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिन्यात एसयुव्ही गटातील मोटारींच्या विक्रीत देशात तब्बल 17.5 टक्के घट झाली आहे.गेल्या चार वर्षांत या मोटारींच्या विक्रीत प्रथमच इतक्या अधिक प्रमाणात घट झाली आहे.अलीकडेच इकोस्पोर्ट एसयुव्हीची किमत 5.59.000 असल्याने बाजारात युद्धस्थिती निर्माण झाली आहे.