डॉलरच्या तुलनेत डॉलरच्या तुलनेत दुबळा झाल्याने विदेशी पर्यटक वाढले

पुणे, – मारीयट हॉटेल समुहाने भारतात आणखी ४ ५ हॉटेल सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आणि त्यातील तीन नवी हॉटेल आगामी ४ ५ दिवसात सुरु केली जाणार आहेत अशी माहिती मारीयट इंटरनाशनलच्या दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष राजीव मेनन यांनी आज चाकण येथे पत्रकार परिषदेत दिली. मारीयट हॉटेल समुहाची न्यूयॉर्क शेअर बाजारात नोंदणी आहे.

पुणे परिसरातील चवथे आणि देशातील दहावे ( हॉटेल कोर्टयार्ड) आजपासून चाकण येथे सुरु झाले. त्याच्या उदघाटनप्रसंगी मेनन पुढे म्हणाले की येत्या काही महिन्यात बंगलोर, दिल्ली येथे व्यवसाय विस्तार केला जाणार आहे. त्यात फ़ेअरफिल्ड हा ब्रान्ड बंगलोरला सुरु होणार आहे. हिंजवडीत ज्या प्रमाणे आम्हाला यश मिळाले तसे येथेही मिळेल कारण आम्ही प्रथम येथे आल्याचा फायदा घेता येणार आहे. गेल्या दहा वर्षात आमची व्यवसाय वाढ स्पर्धकांच्या तुलनेत वेगाने होते आहे. हॉटेल उद्योगाची सरासरी वाढ सहा टक्के असली तरी आमची मात्र दोन अंकी म्हणजे दुप्पट आहे .

दर वर्षी आम्ही १ ० – २ ० नवे करार करत आहोत असे नमूद करून ते म्हणाले की चाकण साठी आम्ही रेडर्स्टोन समूहाच्या शकील लडाख यांच्याशी करार केला आणि ही मालमत्ता विकसित केली. या भागात बहुराष्ट्रीय वाहन कंपन्या आणि नवा विमानतळ होणार असल्याने उद्योजक ग्राहक मिळतील. तसेच आजूबाजूच्या भागातील खेड , पिंपरी, तळेगाव, नारायणगाव येथील लोकांना सेवा देता येईल.

रुपया डॉलरच्या तुलनेत दुबळा झाल्याने आम्हाला इष्टापत्तीच ठरणार असून परदेश प्रवासापेक्षा देशातील अर्बन रिसोर्टला ग्राहक प्राधान्य देतो आहे. गोव्यात येणारे ग्राहक वाढण्याचे तेच कारण आहे. परकी ग्राहकांपेक्षा भारतीय ग्राहकसंख्या ३०टक्क्यांवरून ६७ टक्के झाली आहे. एक मात्र नक्की आहे की ज्या गोष्टी आम्हाला आयात कराव्या लागतात त्याच्या खर्चात रुपया घसरल्याने वाढ झाली आहे.

चाकणच्या हॉटेल कोर्टयार्डमध्ये आसपासच्या गावातील लोकांना ५ ० टक्के रोजगार देण्यात आला आहे अशी माहिती देऊन सरव्यवस्थापक रितू चावला म्हणाल्या की येथील लोकांना सामावून घेण्याने एक सामाजिक योगदान दिले जाते तसेच अप्रत्यक्ष रोजगार संधीही निर्माण होते. कोर्टयार्डमध्ये २ ५ ० लोकांना थेट रोजगार मिळाला आहे.

छायाचित्रात दक्षिण आशियाचे उपाध्यक्ष राजीव मेनन आणि कोर्ट यार्ड चाकण च्या सरव्यवस्थापक रितू चावला शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती देताना