न्यूयॉर्क – रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हाने दुखापतीमुळे यूएस ओपनमधून माघार घेतली आहे. शारापोव्हाची खांदेदुखी पुन्हा उफाळून आली आहे, तिच्या उजव्या खांद्याला बरसायटिसमुळे सूज आली आहे. शारापोव्हाने आपल्या वेबसाईटवर ही माहिती जाहीर केली. त्यामुळे न्यूयॉर्कमधील टेनिसफॅन्सची निराशा झाली आहे.
दुखापतीमुळे शारापोव्हाची यूएस ओपनमधून माघार
शारापोव्हाने 2006 साली यूएस ओपनचं जेतेपद मिळवलं होतं तर गेल्या वर्षी शारापोव्हा सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. गेला काही काळ शारापोव्हा खांदेदुखीने त्रस्त आहे. 2008 सालीही खांदेदुखीमुळे ती यूएस ओपनमध्ये खेळू शकली नव्हती. यंदाही फ्रेन्च ओपनपासूनच शारापोव्हाला खांदेदुखीचा त्रास जाणवतो आहे.
यंदा विम्बल्डनमध्ये ती दुसर्याच फेरीत गारद झाली होती. त्यानंतर तिने जिमी कॉनर्सची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. मात्र हा करार एकाच सामन्यापुरता टिकला. आता यूएस ओपनमधून शारापोव्हाने माघार घेतल्यामुळे या स्पर्धेत तिच्याऐवजी अग्निएस्का रद्वांस्काला तिसरं मानांकन मिळालं आहे. 26 ऑगस्टपासून न्यूयॉर्कच्या फ्लशिंग मिडोजमध्ये या स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
