दाभोळकरांची हत्या म्हणजे पुरोगामी विचारांची हत्या- अण्णा हजारे

न्यूयॉर्क – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही व्यथित झाले आहेत. अमेरिका दौर्‍यावर असलेल्या अण्णांनी आज बुधवारचे सगळे कार्यक्रम रद्द केले. दाभोळकरांच्या हत्येच्या वृत्ताने आपल्याला मोठा धक्का बसल्याचे अण्णा म्हणाले.

दाभोळकरांची हत्या म्हणजे पुरोगामी विचारांची हत्या आहे. या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्राला कधीही पुसून न निघणारा कलंक लागला आहे, असे अण्णांनी न्यूयॉर्कमधून एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. सामाजिक परिवर्तानाच्या दृष्टीने त्यांचे जे प्रयत्न होते, ते मला फार महत्त्वाचे वाटतात. त्यामुळे त्यांच कार्य सुरु ठेवणे ही सर्व कार्यकर्त्यांची जबाबादारी आहे.

Leave a Comment